७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ ला मतमोजणी
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई, (फैजल पठाण शिरूर)
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुधारित करण्यात आला आहे. राज्य शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण:
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, २८ ते ३० जानेवारी या कालावधीत राज्य सरकारने दुखवटा जाहीर केल्याने उमेदवारांना प्रचार करणे शक्य होणार नाही. ही अडचण लक्षात घेऊन आयोगाने मतदानाचे उर्वरित टप्पे नव्याने निश्चित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३१ जानेवारी रोजी या सुधारित कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल.
आचारसंहिता लागूच राहणार:
निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू असून निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहील, असे निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




