डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची पदाधिकारी निवड मीटिंग
शिवशाही वृत्तसेवा,सातारा( प्रतिनिधी शुभम कोदे )
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी निवडी संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस सातारा येथे मीटिंग झाली यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे सचिव संदीप माने कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे प्रसिद्धी प्रमुख संदीप पवार महिला जिल्हाध्यक्ष वैशाली खाडे अशा अनेक पदाधिकारांची निवड करण्यात आली यावेळी बोलताना राजा माने साहेब म्हणाले डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना दोन हजार अठरा साली करण्यात आली
असून संघटनेचे चार राज्यात सभासद असून सभासद संख्या बारा हजार च्या वर पोचली आहे संघटनेने डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला राज्य मान्यता मिळवून दिली असून प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियाचाही दर्जा समान असल्याची मागणी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतली आहे विस्कळीत व बाल्यावस्थेतील पत्रकारांना संघटित करून त्यांना चांगला दर्जा व क्षमता मिळवून देण्यासाठी संघटना स्थापन केली
संघटनेने प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या मुलांसाठी वैद्यकीय शैक्षणिक व आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी मदत करते अशी मदत करणारी भारतात कुठलीही संघटना नाही पत्रकारांना सन्मान मिळवून देण्याचे काम आपली संघटना करत राहील यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश सावंत विकास भोसले गणेश बोतालजी संजय कदम प्रवीण नागणे यांनी मनोगत व्यक्त केले आभार साप्ताहिकचे विंगचे राज्य अध्यक्ष संजय कदम यांनी मानले
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()



