वाई येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाजातील चांगल्या वाईट गोष्टी मांडताना वाई तालुक्यातील पत्रकार नेहमीच सकारात्मक असतात त्यामुळे वाई उपविभागात काम करताना ऊर्जा मिळते,असे गौरवोद्गार वाई उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांसाठी ठेवलेला ब्लेझर ड्रेसकोड. यामुळे सर्व पत्रकार आकर्षक, स्मार्ट व आत्मविश्वासपूर्ण दिसत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे होते.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, नगराध्यक्ष अनिल सावंत निवासी तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे,पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे,उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर,शिवाजीराव जगताप तालुकाध्यक्ष सचिन ननावरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संस्थेचे अध्यक्ष व दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सचिन ननावरे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाच्या कामकाजाचा आढावा सादर केला.पुढील वाटचालीवर भाष्य केले.माजी अध्यक्ष व लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी विश्वास पवार यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकारांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली, तर पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी पत्रकार व पोलीस यांची भूमिका समान असल्याचे सांगून वाईतील पत्रकारांच्या समाजाभिमुख भूमिकेचे जाहीर कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले. व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी संध्याकाळी ओझर्डे येथे आयोजित मेळाव्यामध्ये सर्व पत्रकारांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला व पुढील काळात पत्रकारांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये सदैव आपण तत्पर असल्याचं आश्वासित करून पत्रकारांना सन्मानित केले व किसनवीर महाविद्यालय वाई येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर फगरे सर व संस्थेने पत्रकारांचा यथोचित मानसन्मान राखत त्यांना सन्मानित केले याबद्दल पत्रकार संघाने या सर्वांचे आभार व्यक्त केले असून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे पत्रकार दिनाचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
उपस्थितांचे स्वागत भद्रेश भाटे,विलास साळुंखे,धनंजय घोडके,जयवंत पिसाळ,पांडुरंग भिलारे,किशोर रोकडे,विकास जाधव,कुमार पवार चरण गायकवाड,संजीव महामुनी यांनी केले,आभार धनंजय घोडके यांनी मानले.यावेळी वाई तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



