गहाळ झालेले मोबाईल फोन शोधण्याची मोहिम
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाचवड, भुईंज अशी मुख्य बाजारपेठा असुन आजुबाजुच्या गावातुन हजारोंच्या संख्येने लोक खरेदी, विक्री, करीता येत-जात असतात. प्रवासा दरम्यान तसेच इतर ठिकाणी त्यांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई सुनिल साळुंखे, विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणे करीता डी.बी. पथकास सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने डी. बी. पथकातील पो.कॉ. आकाश कुंभार, सागर मोहिते यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबींचे आधारे महाराष्ट्रा सह इतर राज्यातुन हस्ते, परहस्ते गहाळ झालेले मोबाईल फोन वापरत असलेल्या मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबवुन भुईंज पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले ६,७०,०००/- रुपये किमतीचे एकुण ३० स्मार्ट फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. यामध्ये एक आयफोन-१४ प्रो-मॅक्स हा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. यापुढे अशाच प्रकारची गहाळ झालेले मोबाईल फोन शोधण्याची मोहिम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, भुईंज पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी वाई सुनील साळूंखे, विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईंज पोलीस ठाणे पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, स.पो.फी.वैभव टकले, पो.हवा. नितीन जाधव, पो.हवा. कोलवडकर, पो.कॉ. वाघमळे, पो.कॉ. रमेश बरकडे, पो.कॉ. बल्लाळ, पो.कॉ. निंबाळकर यांनी पुर्ण केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



