ओझर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा भव्य नागरी सत्कार
ओझर्डे जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या वृषाली चव्हाण आणि पंचायत समिती सदस्या हर्षदा फरांदे यांचा ओझर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना, मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावपातळीवरील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे नवनिर्वाचित प्रतिनिधींनी सांगितले.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित सदस्या म्हणाल्या की, "रस्ते, पिण्याचे पाणी आणि दर्जेदार शिक्षण या गावपातळीवरील मूलभूत समस्यांवर आमचा विशेष भर असेल. विकासकामे करताना पूर्णतः पारदर्शकता ठेवली जाईल आणि शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
या सत्कार समारंभाप्रसंगी ओझर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेखर फरांदे, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा शिंदे आणि सुरेखा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवरील ग्रामविकास अधिकारी संजय वर्णेकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद सोनवणे, हणमंत कदम, अमर पिसाळ, संगणक प्रतिनिधी संध्याराणी सोनवणे आणि योजनादूत आरती फरांदे यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला पत्रकार दौलतराव पिसाळ, बाळकृष्ण सोनवणे, संदीप निकम यांच्यासह शुभम फरांदे, रोहन कदम, पप्पू फरांदे, वरुण पिसाळ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून आगामी विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



