जप्त केलेली ओम्नी गाडी सोडण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या म्हसवडच्या महिला पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

महिला पोलीस हवालदार निता नारायण पळे यांच्यावर कारवाई 

Case registered against woman who demanded bribe, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

अपघाताच्या गुन्ह्यात जप्त केलेली गाडी सोडून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार निता नारायण पळे यांच्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये त्यांची मारुती सुझुकी ओम्नी कार क्र. एम एच 45  एन 6729  पोलिसांनी जप्त केली होती. ही जप्त केलेली कार पुन्हा सोडून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात तपास अधिकारी असलेल्या निता नारायण पळे यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

​याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर दि.७ जानेवारी २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान पळे यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सातारा एसीबीचे पोलीस उप-अधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, सुनील पाटील व पो. हवा. गणेश ताटे, निलेश राजपुरे, पो. कॉ. नवनाथ शिंदे, मपोकॉ. स्नेहल गुरव यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सातारच्या एसीबी विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित विभागाच्या कार्यालयीन क्रमांकावर किंवा हेल्पलाईन १०६४ वर संपर्क साधावा.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !