भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती निवडणूक प्रतिष्ठेची
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यात राष्ट्रवादी जिल्हा परिषद तीन गटात विजयी तर भाजप एक गटात विजयी, वाई पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी पाच ठिकाणी विजयी तर भाजप तीन गणांमध्ये विजयी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये वाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.मकरंद पाटील यांनी आपला राजकीय गड यशस्वीपणे राखत वर्चस्व सिद्ध केले आहे. गावोगावी केलेल्या प्रभावी मोर्चा बांधणीमुळे राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले असून भाजपला काही ठिकाणी विजय मिळवता आला आहे. वाई तालुक्यात राष्ट्रवादी जिल्हा परिषद तीन गटात विजयी तर भाजप एक गटात विजयी, वाई पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी पाच ठिकाणी विजयी तर भाजपला तीन गणांमध्ये विजय संपादन करता आला आहे. निकाला नंतर बावधन गटाच्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ऋतुजा शिंदे या विजयी झाल्या तर बावधन गणामध्ये भाजपचे सचिन भोसले विजयी झाले. तद्नंतर विजयी गुलाल उधळण्यास सुरुवात झाली त्यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सामोरा समोर आल्याने एकमेकांना डिवचण्याचा प्रयन्त झाल्याने वातावरण प्रचंड दहशतीचे निर्माण झाले. पोलिसांच्या खबरदारीमुळे अनुचित प्रकार टाळला यामध्ये काही पोलीसानांही धक्काबुक्की झाली. परंतु पोलिसांनी बाळाचा वापर केल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आले. परंतु बावधन गटात राष्ट्रवादीचा गड आला पण सिंह गेला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भुईंज गट राष्ट्रवादीच्या ताब्यात होता यावेळी मात्र मदन भोसले यांनी संपूर्ण लक्ष गटावर ठेवल्याने भुईंज गट व एका गणात विजय संपादन करून गट ताब्यात मिळविण्यात यश मिळाले. तर भुईंज गटात राष्ट्रवादीने तोच-तो उमेदवार दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ओझर्डे गटात राष्ट्रवादीने आपली सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. तर यशवंतनगर हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने या गणात भाजपची ताकद आहे. यशवंतनगर गट व अभेपुरी गण राष्ट्रवादीने खेचून आणत या ठिकाणचा भाजपचा फाजील आत्मविश्वास नडल्याचे निकालावरून स्पष्ठ झाले आहे.
या निवडणुकीत भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठेची लढत करत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, भाजपचा काही ठिकाणी अतिआत्मविश्वास नडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याचा फटका पक्षाला काही महत्वाच्या गटांमध्ये बसल्याचे चित्र आहे. वाई तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन गटांमध्ये विजय मिळवत बहुमताकडे मजबूत पाऊल टाकले आहे. तर भाजपला केवळ एका गटात विजय मिळवता आला आहे. पंचायत समिती गणांमध्येही राष्ट्रवादीची सरशी ठळकपणे दिसून आली असून पाच गणांमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. भाजपला तीन गणांमध्येच समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेच्या यशवंतनगर गटात राष्ट्रवादीचे दिनकर शिंदे, बावधन गटात ऋजुता विराज शिंदे, ओझर्डे गटात श्रीमती वृषाली ललित चव्हाण, तर भुईंज गटामध्ये भाजपचे दिलीप बाबर हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भुईंज गट भाजपने पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे.
तसेच यशवंतनगर गणात भाजपचे स्वनिल गायकवाड, अभेपुरी गणामध्ये राष्ट्रवादीचे पै.विक्रांत डोंगरे, बावधन गणामध्ये भाजपचे सचिन भोसले, शेंदुरजने गणात राष्ट्रवादीच्या वर्षा जगताप, ओझर्डे गणात राष्ट्रवादीच्या हर्षदा फरांदे, केंजळ गणात राष्ट्रवादीचे शैलेश सपकाळ, भुईंज गणात भाजपच्या सुरभी भोसले, पाचवड गणात राणी कांतीलाल पवार या विजयी झाल्या आहेत.
या निकालामुळे वाई तालुक्यातील राजकीय समीकरणां मध्ये स्पष्ट बदल दिसून येत असून मकरंद पाटलांचे नेतृत्व पुन्हा एकदा निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. वाई तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी नंबर एकच पक्ष असल्याचे समोर आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी करेक्ट नियोजन करून नगरपालिकेतील पराभवाचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री मकरंद पाटील यांना अजित दादांच्या जाण्याची सहाभूती सुध्दा मिळाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी भयमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी वाईचे डिवाय एसपी
सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी एसपी कार्यालयातील सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीमती सोनावले मॅडम वाईच्या डिबीचे प्रमुख पिएस आय सुधीर वाळुंज पिएस आय पांगारे पिएस आय अमित सुर्वे व सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.तर हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांन वर पोलिस यंत्रणेची करडी नजर होती.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



