नातीचा वाढदिवस शाळेतील मुलांना मदत देऊन साजरा
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
आपल्या लहान मुलांचा वाढदिवस म्हटला की प्रत्येक जण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखात असतात मात्र बावधन हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शहाजी पिसाळ गुरुजी यांनी आपल्या नातीचा वाढदिवस वाई तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा दरेवाडी येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग शालेय वस्तू व खाऊ वाटप करून लागणाऱ्या वस्तू, आणि शाळेतील मुलांना भोजन देऊन अमेरिकेत असणाऱ्या आपली नात कुमारी साव्या व नातू ध्रुव याचा वाढदिवस शाळेतील मुलांच्या समवेत साधेपणाने साजरा करून एक सामाजिक सद्भावना जपत शाळेसाठी मदत देऊन साजरा केला.
व निवृत्त मुख्यधापक शहाजी पिसाळ गुरुजी यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी हितगुज केली. तसेच साव्या आणि ध्रुव यांच्या वाढदिवसाचा होणारा अवास्तव खर्च याला फाटा देत आपल्या परिसरातील शाळांमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी आज राबवला. आजच्या या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच मनोहर शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा मोनिका साळुंखे ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ आणि शाळेचे मुख्याध्यापक रामदास गायकवाड सर्व शिक्षक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी आपले मत व्यक्त केले, शहाजी पिसाळ गुरुजी शाळेत आले. त्यांनी त्यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल आम्हाला सांगितले. आम्ही त्याचे स्वागत केले. त्यांनी दिलेल्या भेटवस्तूमुळे विद्यार्थ्यांसहित आम्हांलाही खूप आनंद झाला. अशा निस्पृह माणसांमुळेच समाजाचा आणि देशाचा विकास होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



