मोकाट कुत्र्यांनी वासराला केले होते जखमी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे सोनेश्वर परिसरात अज्ञात व्यक्तींनी गाईच्या लहान वासरला सोडून दिले होते, त्याला मोकाट कुत्र्यांनी जखमी केले होते, हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ओझर्डे चे सुरज लोखंडे, प्रतीक भोईटे, आकाश जाधव यांच्या निदर्शनास आले त्यांनी स्वखर्चाने टेम्पो आणून जखमी वासरास करुणा मंदिर गोशाळा वेळे येथे सुखरूप सोडले.त्याचे ओझर्डे परिसरातून कौतुक होत आहे.
भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना बोलताना सांगितले की कोणत्याही शेतकऱ्यांनी अशी लहान वासरे सोडताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अन्यथा त्या शेतकऱ्यांनी आपली लहान वासरे आपल्या जवळच्या गोशाळेत जाऊन सोडावी अशी माहिती कार्यकर्त्यांना दिली.
शेतकऱ्यांना विनंती आहे लहान कोवळ्या गाई, खोंड, वासरांना असे सोडून देऊ नका तुम्हाला सांभाळायला जमत नसेल तर त्याना गवत, वैरण खायला येईल अशी झाल्यावर गोशाळेत नेऊन सोडा , आपल्या हातून कोवळ्या जीवांचे बळी देऊ नका अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे.
गोरक्षक मनोज जाधव (भुईंज)
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा