जेष्ठ नेते व ग्रामस्थांनी केला सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
फुलंब्री तालुक्यातील निधोना गावच्या उपसरपंचपदी राधा संतोष गाडेकर यांची बहुमताने निवड झाली. राधा गाडेकर यांना सहा मती पडली, तर प्रतिस्पर्धी संतोष निधोनाकर यांना चार मते पडली. सुभाष बबन गाडेकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेले जागेवर दिनांक 31 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा घेण्यात आली. सकाळी दहा ते दोन दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडली, दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवारी अर्ज पैकी जनार्दन आव्हाड यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले.
गुप्त मतदान पद्धतीने प्रक्रिया पार पडली यात राधा गाडेकर यांना सहा मते मिळाली व दोन मतांनी विजय झाला. म्हणून राधा संतोष गाडेकर उपसरपंच पदी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच सुमन अवचित राऊतराय, सदस्य, बिजूबाई , मनीषा राजपूत, सुभाष राऊतराय, जनार्दन आव्हाड, संतोष निधोनकर, ज्ञानेश्वर गाडेकर, रूपाली सोनवणे, मोईन शेख, यांच्या उपस्थिती होते. उपसरपंच निवडीसाठी अशोक (आबा) गाडेकर, कौतिक राऊत राय, सागर गाडेकर, बंटी पांडव, भावसिंग राजपूत, दादाराव राऊत राय, नारायण गाडेकर, यांनी स्वागत केले. निवडणुका अधिकारी, एम आय खरे, तलाठी गंगावणे, ग्रामविकास अधिकारी, वाघ यांनी निवडणूक पार पाडली.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा