क्रशर विरोधी लाँगमार्चने धारण केले उग्र स्वरूप
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
१४व्या दिवशी २१० किमीचा पाई प्रवास पूर्ण करत लॉंग मार्च पनवेल या ठिकाणी दाखल झाला. मुसळधार पाऊस वारा सहन करत महिला वृद्ध तरुण मंत्रालयाच्या दिशेने आपले दृढनिश्चयाचे पाऊल टाकत निघाले आहेत.
१४ व्या दिवशी सुद्धा शासनाकडून क्रशरबंदीचा निर्णय न झाल्यामुळे संतापलेल्या महिलांनी आज लोकशाहीची अंत्ययात्रा काढली. सबंध महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे लोकशाहीची अंत्ययात्रा महिलांनी काढल्याचा हा पहिला प्रसंग आहे. शासन जोपर्यंत आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाचे स्वरूप उग्रच होत राहणार हा संदेश या अंतयात्रेच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
शासनाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये विविध प्रशासकीय विभागांच्या अहवालांवर क्रेशर खाण पट्टा आदेश बंदीची प्रक्रिया होणार आहे. मात्र एका बाजूला मोठा राजकीय दबाव जो गोरगरिबांचा सर्वसामान्यांच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही आणि दुसऱ्या बाजूला तीन गावातील ग्रामस्थांच्या आंदोलनाची उग्रता व जीवावर उदार होऊन मंत्रालयाच्या दिशेने निघालेला दृढनिश्चय. या सर्व परिस्थितीमध्ये खानपट्ट्याशी निगडित सर्व शासकीय विभाग पुन्हा चुकीचे अहवाल सादर करणार का व तसे झाल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर राज्य सरकार कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
मात्र क्रशर बंद करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार चौदाव्या दिवशी सुद्धा तितकाच मजबूत असल्याचा दाखला आज ग्रामस्थांनी दिला.
आंदोलनाबाबत पसरविण्यात येणारे गैरसमजला आज आंदोलनकर्त्यांनी अंतयात्रा काढत एकजुटीने उत्तर दिले व आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडत नाही हे सुद्धा दाखवून दिले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा