हाती काहीच न लागल्याने चोरट्यांची निराशा - पाणी तापवण्याचा बंब केला लंपास
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओझर्डे येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दिड ते दोन च्या दरम्यान लोखंडी गजाच्या साह्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने शेजारील घरासमोरील पितळाचा पाणी तापवण्याचा बंब चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ओझर्डे ता.वाई येथे मालदारा वस्ती येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे यांच्या घरी रात्री दोन वाजता घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरट्याने केलेला असून लोखंडी गजाच्या सहाय्याने घराचे कुलूप तोडून घरामध्ये कपाटातील वस्तू व कपडे अस्ताव्यस्त करून घरामध्ये टाकलेले होते.यामध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही त्यामुळे शेजारी आनंदा बापू फरांदे यांच्या घरासमोरील पाणी तापवण्याचा तांब्याचा बंब चोरट्याने पळवला.
जाताना चोरट्यांनी जनार्दन महादेव फरांदे यांच्या गोठ्यातील बांधलेल्या गाईच्या दावी सोडलेली आहेत, त्यामुळे दूध देणाऱ्या गाई पळवण्याचा त्यांचा उद्देश होता . लोक जागरूक असल्याने चोरटे निघून गेले या संदर्भात ओझर्डे गावचे पोलीस पाटील मच्छिंद्र कोदे व भुईज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांना अविनाश फरांदे यांनी फोन द्वारे कळविलेले आहे पोलिसांनी सदर चोरट्यांचा शोध घ्यावा असे अविनाश फरांदे, जनार्दन फरांदे, आनंद फरांदे व सोपान फरांदे आशुतोष गार्डी, नामदेव गायकवाड संजय कुंभार यांनी केलेले आहे
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा