२५ वर्ष पूर्ण केली आहे विना अपघात विना तक्रार सेवा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मा नामदार पालकमंत्री सातारा शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाई आगर येथे २५ वर्ष विना अपघात विना तक्रार सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झालेले श्री राजाराम नेवसे मु. पो. करजखोप ता कोरेगाव जि सातारा यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख हरिदास जगदाळे यांच्या सौजन्याने हिंदूहृदयसम्राट शौर्य प्रताप जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला ते टाॅफी व सन्मान पत्र सौ व श्री नेवसे यांना पालक मंत्री शभुराज देसाई व शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांच्या हस्ते आज १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देण्यात आला
या प्रसंगी पालक मंत्री शभुराज देसाई यांनी चालक नेवसे याचे कौतुक केले व या पुढेही शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांनी शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम सुरू ठेवावा अशी सुचनाही केली या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














