बावधन येथे नागरी सत्कार समारंभात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या बागड यात्रेचे आराध्य दैवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराला येत्या तीन महिन्यात " ब " वर्गाचा दर्जा देणार आहे.तसेच मंदिराच्या सुशोभीकरणासाठी चालू वर्षी अडीच कोटी आणि पुढील वर्षी अडीच कोटी असा पाच कोटी निधी मंजूर केला आहे.तर येणाऱ्या पंधरा दिवसात येथील स्मशानभूमीस पन्नास लाख रुपये निधी देऊन उरलेल काम लवकरच पूर्णत्वास जाईल अशी घोषणा यावेळी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.बावधन येथील नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम,सुनील काटकर,महिला विकास आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सुरभी भोसले,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ,किसनवीर कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ,भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक ननावरे, ॲड.विजयसिंह ठोंबरे, ॲड.विजयसिंह पिसाळ, रोहिदास पिसाळ, केशव पिसाळ आधी मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.राज्याचा मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर येथील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) यांच्या वतीने हा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की,गेले अनेक वर्षे माझ्या मतदार संघात पाणी प्रश्नावरून विरोधकांनी राजकारण केलं परंतु येणाऱ्या काळात पाण्यासाठी माझ्या मतदार संघात निवडणूक होणार नाही,अशी व्यवस्था आता झाली आहे.तसेच जे लोक बोलत होते की या मतदार संघात ऊस कधी पिकणार नाही ते मतदार संघातील शेतकरी आज पाच कारखान्यांना ऊस पुरवितो.त्यामुळे तरुणांनी राजकारणामध्ये संयम पाळणे गरजेचे आहे तसेच,योग्य वेळी योग्य निर्णय घेतले पाहिजेत.तसेच या ठिकाणी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कसला ही त्रास होणार नाही यांची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे.कवठे – केंजळ येथील पाणी योजना जी प्रलंबित आहे त्याकडे स्थानिक नेते आणि आमदार यांनी जातीने लक्ष घालून ती पूर्ण करावी.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) गटाचे शशिकांत पिसाळ यांनी आमच्या सोबत राहावे.नक्कीच त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशी अप्रत्यक्ष ऑफर श्री गोरे यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आमच्याकडे दिवस खूप कमी होते.आशा वेळी माझ्या गावातील आणि परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र तसेच राज्यामध्ये युती असून सुधा आणि आम्ही युतीच्या विरोधात असून देखील माझ्यासाठी पक्ष बाजूला ठेऊन मला साथ दिली.त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकत्रपणे निवडणूक लढवून आणि विरोधकांना मात देऊ,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या अरुणादेवी पिसाळ यांनी केले.
वाई तालुका भाजप अध्यक्ष दिपक ननावरे म्हणाले आजपर्यंत मी जो काही आहे,तो सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही माझ्या लहान मोठ्या मित्र बांधवांच्यामुळे.त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी मी कोणाचे पाय धरायला तयार आहे. पण माझ्या कार्यकर्त्याच्या कोणी वाट्याला गेले तर तोच पाय मोडायचा देखील मी मागे पुढे पाहणार नाही. ज्यानी मदत केली त्याचे उपकार फेडायचे व ज्यानी विरोध केला त्याचा कार्यक्रम करायचा.
बावधन गावाला सुसंकृत राजकीय वारसा आहे.आजपर्यंत गावामध्ये अनेक राजकीय नेते होऊन गेले पण त्यांनी कोणासोबत ही कौटुंबिक रोष न ठेवता विचारांचे आणि विकासाचे राजकारण केले.परंतु सध्याचे काही नेते स्वतःची पातळी विसरली आहेत.राजकारण करत असताना नीतिमत्ता आणि काही मर्यादा पाळणे गरजेचे असते.विधानसभा निवडणुकीत आमच्यावर स्थानिक स्वयंघोषित नेत्यांकडून जी चिखलफेक झाली त्याचे प्रतिउत्तर येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढून देणार आहोत.आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ.
ॲड.विजयसिंह पिसाळ
नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा