भारतीय बहुजन पालक संघाच्या आंदोलनाला यश
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
मुंबई येथे १३ ऑगस्ट २०२५ पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिरूर मधील दहा खाजगी शिक्षण शाळा/संस्था यांच्या मनमानी नियमबाह्य कारभार, भ्रष्टाचार या विरोधात नाथाभाऊ पाचर्णे,विद्यार्थी व इतर पालक यांनी मिळून आमरण उपोषणाला सुरुवात केली.या साठी पालक आणि विद्यार्थी,सामाजिक जबाबदारीची जाणीव असणारी मंडळी यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट देऊन आमरण उपोषण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.
सदर उपोषण आंदोलन असल्यामुळे दोन दिवसात लहान विद्यार्थ्यांची प्रकृती खराब होऊ लागल्याने, आंदोलनात सहभागी विद्यार्थी व पालकांच्या मागण्याची दखल घेण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालयाला कार्यालयीन सुट्टी असताना सुद्धा लहान मुलांच्या तब्येतीची काळजी असल्या मुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांनी 15 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी मंत्रालयातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्यक्तिशः चर्चा करून व यशस्वी मध्यस्थी करून सदर प्रकरणात लक्ष वेधून घेण्याचे कर्तव्य पोलिस आयुक्त यांनी केले.
पोलिस आयुक्त यांना जे पत्र शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दिले त्या मध्ये शिरूर जिल्हा -पुणे येथील १० शाळांवर कार्यवाही करण्याच्या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात काही तांत्रिक माहितीची अपूर्णता असल्याने शासनाला तातडीने निर्णय घेता येणे शक्य होत नसल्याने,सदर आवश्यक माहिती शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुर्तता झाल्यावर सदर शाळांवर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही होणार आहे असे लेखी पत्र बृहन्मुंबई पोलीस आयुक्त व मंत्रालयीन अधिकारी यांनी देऊन सदर उपोषण सोडण्याची विनंती केली.
शासन विनंतीचा व सहकारी विद्यार्थी व पालक यांच्या प्रकृतीचा विचार करून व दिलेल्या पत्राच्या वरून सदर आमरण उपोषण हे दिनांक १६ ऑगस्ट २०२५ पासून तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात येत आहे.
जर शासनाने पुढील एक महिन्यात आवश्यक कारवाई न केल्यास सदर आंदोलन पुन्हा विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन अजून मोठ्या संख्येने सुरू करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी प्रशासनास नाथाभाऊ पाचर्णे आणि पालक सहकाऱ्यांनी दिला आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा