वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत, विद्यार्थी मार्क्सवादी न होता तो तर्कवादी आणि विज्ञाननिष्ठ घडला पाहिजे, विविध समाज सुधारकांचे विचार लहान वयातच मुलांच्यावर बिंबवले पाहिजेत असे प्रतिपादन प्राचार्य रविंद्र यांनी व्यक्त केले.
पी. एम. श्री. कै. भ. को. खरात शाळा क्रमांक दहाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाई नगरपालिकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ खरात होते. त्यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. निलीमाताई खरात, प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर, कृषिमित्र अरुण आदलिंगे, महादेव अडागळे, विकास जाधव, सुजाता यादव, प्रियांका जाधव, युगल घाडगे, मयूर खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषिमित्र अरुण आदलिंगे यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तक मित्र बनावे, वाचावे, त्यातले वेचावे, अभ्यासाबरोबर आहाराकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
राजाभाऊ खरात म्हणाले गेले अकरा वर्षे वक्तृत्व स्पर्धा अखंडित सुरु आहे. राजामाता अहिल्यादेवीचा हा विचारांचा जागर आम्ही अखंडित चालू ठेवणार आहे. कार्यक्रमात सौ. निलीमाताई खरात, महादेव अडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका शारदा परामाणे यांनी स्वागत केले. प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय संतोष माडकर यांनी केला, शिवराज धायगुडे, कु. गार्गी गाढवे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सीमा तांबे, प्रिती ससाणे यांनी केले, संगीता अरगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी किसन रेजर, श्याम पवार, गंजानन खंदारे, मुरलीधर जाधव, आशा मोरे, अश्विनी सूर्यवंशी, रंजना पवार, ग्रामस्थ, विविध शाळातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा