युवासेना नांदेड जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढग फुटीमुळे, वा अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे आणि , सततच्या पावसामुळे कापसाच्या व सोयाबीन,तूर , ज्वारी,या खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे आपण सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच शासनाने पंचनाम्याची वाट न पाहता सरसकट हेक्टरी 50000 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन त्यांनी ऑनलाईन ईमेल आयडी वर पाठवले असून तात्काळ मागणीची पूर्तता करा अशी विनंती युवासेनेचे जिल्हाप्रमुख एडवोकेट अक्षय वट्टमवार यांनी शासनाकडे केली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा