वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण नर्सिंग कॉलेज व इतर संस्थांचा सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
संताचे पालख्या पंढरीच्या दिशेने पायी चालत येत आहेत. या पायी चालत येणारे भाविकांचा थकवा घालवण्यासाठी फिजीओथेरपी ,मसाज,चरण सेवा करण्यासाठी ,वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशन,संचलित,जनकल्याण नर्सिंग कॉलेज, मुक्ताई नर्सिंग कॉलेज,व शिवस्वराज्य मेडीकल फाऊंडेशन,संचलित,राष्ट्रमाता जिजाऊ नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून हजारो रुग्णांची सेवा केली.
मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या संकल्पनेतून व यावेळी संस्थेचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आषाढी यात्रेसाठी प्रमुख पालख्यांसह विविध साधु - संताचे पालख्या पंढरीच्या दिशेने वारकरी भाविक भक्त पायी चालत येत आहेत. या पायी चालत येणारे भाविकांचा थकवा घालवण्यासाठी वारकऱ्यांची चरणसेवा, पायाची मालिश करणे, दुखणाऱ्या अंगाचा शिणवटा कमी करण्यासाठी फिजीओ थेरपी करण्यात उपक्रम घेण्यात आला. सदर शिबीरात 200 विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग घेवून भाविक भक्तांची सेवा करत आहेत,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधीर शिनगारे,नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य सौ विद्या कुचेकर, प्राचार्य काझी,प्राचार्य अहिरसंग व सर्व शिक्षक,राजेंद्र साळुंखे या उपक्रमासाठी प्रयत्नशील आहेत
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा