अपेक्षित जागेवर आरक्षण पडल्अयामुळे नेकांची स्वप्ने भंगली
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत आज तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने भंगली असून राजकीयदृष्ट्या सवेंदनशील गावांमध्ये जागा आरक्षित झाल्यामुळे पुढार्यांची डोकेदुखी वाढली आहे.
आजच्या आरक्षण सोडतीमध्ये
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवसाठी
केंजळ,पसरणी, अनवडी, मोहडेकरवाडी, मांढरदेव, धोम, खोलवडी, कोंडावळे, गुंडेवाडी (पिराचीवाडी), वडोली, दसवडी, परतवडी, गाढवेवाडी, दरेवाडी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला
बावधन, सुरूर, खावली, उडतारे, व्याजवाडी, भिवडी पुनर्वसन, वेलंग, कोंढवली, ओहळी, अनपटवाडी, मुगाव, न्हाळेवाडी, कुसगाव, वेरूळी (डूईचीवाडी)
अनुसूचित जाती महिला
कनूर, गुळुब, जांब, लगडवाडी, वाशिवली,
अनुसूचित जाती खुला
उळुब, एकसर, चांदवडी पुनर्वसन, जांभळी, परखंदी.
अनुसूचित जमाती महिला
वहागांव,
अनुसूचित जमाती खुला
विरमाडे
सर्वसाधारण महिला
अमृतवाडी, भुईंज, शहाबाग, कडेगाव, राऊतवाडी, पाचवड, गोळेगाव, पांडेवाडी, चिखली, बोपर्डी, बोरिव (व्याहळी कॉलनी), धावडी, देगाव, बोरगाव, वायगाव, किरोन्डे, लोहारे, नांदगणे, निकमवाडी, आनंदपुर, भोगाव, सटालेवाडी, शेलारवाडी, मालतपूर (धावली), ओझर्डे, बोपेगाव, विठ्ठलवाडी, पांढरेचीवाडी, वासोळे (भिवडी), व्याहळी पुनर्वसन,
सर्वसाधारण खुला
सुलतानपूर, बेलमाची, खानापूर, चिंधवली, शिरगाव, धोम पुनर्वसन, मेनवली, वेळे, कवठे, काळंगवाडी, अभेपुरी (पाचपुतेवाडी, वडाचीवाडी), शेंदुरजने,चिखली (वाडकरवाडी), चांदक, पांडे, दह्याट, वाघजाईवाडी, आकोशी, वरखडवाडी, आसरे (आंबेदारावाडी, पानस), नागेवाडी, मुंगसेवाडी, बालेघर, जोर, कळंबे, खडकी, गोवेदिघर, आसले, यशवंतनगर, रेनावळे या गावांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण २७ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती महिला पाच व सर्वसाधारण पाच अशा दहा जागा आरक्षित करण्यात आले आहेत. सर्वसाधारण साठी एकूण ६० जागा आरक्षित ठेवण्यात आले असून त्यापैकी ३० महिला तर सर्वसाधारण साठी ३० जागा आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जमाती महिलांसाठी एक व सर्वसाधारण साठी एक जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली त्यांना नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, वैभव पवार यांनी सहकार्य केले. यावेळी विविध गावातील ग्रामस्थ व नेते उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा