पर्यावरण रक्षणासाठी कौतुकास्पद उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
अनुरूद्वाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व अनिरुद्ध आदेश पथक तसेच वनक्षेत्रपाल कार्यालय वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यातील चांदक येथील वनक्षेत्र फॉरेस्ट क नंबर 29 व डोंगर माथ्यावर व गावानजीक असणाऱ्या परिसरात रविवार दि. 29 रोजी नऊ हजार पाचशे सीडबॉल पेरण्याचे काम अनिरुद्ध राज अकॅडमी चे सर्व विद्यार्थी व वनक्षेत्र कर्मचाऱ्यांनी केले यापासून हिरडा बेर्डा भावा करंज कडुलिंब अशा वनस्पतीची रोपे तयार करणे हा उद्देश असून ही रोपे इतर ठिकाणी मोठी झाल्यानंतर लावता येतात हा कार्यक्रम माननीय उपवनसंरक्षक सातारा सौ आदिती भारद्वाज मॅडम सह वनरक्षक सातारा प्रदीप रौंद्वाल वाईचे वनक्षेत्रपाल महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा