जनतेच्या समस्यांबाबत विविध विभागांना निवेदने
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित आढावा बैठक नुकतीच मधुरा गार्डन येथे संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे तालुक्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिरात महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर वाई आगारात जिल्हाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी प्रशासनाला निवेदन सादर केले. पुढे वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची भेट घेण्यात आली. तसेच महसूल विभागात तहसीलदार सोनाली मिटकरी यांनाही विविध मागण्यांसह निवेदने देण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “शिवसेना तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देऊन वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचवली जाईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संघटनेची वाटचाल बळकट करणार आहोत.”
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, प्रमुख महिला आघाडी वर्षाताई आरडे, वाई तालुका शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भिलारे, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष विकास शिंदे, युवासेना वाई तालुका गणेश पवार, युवासेना विधानसभा प्रमुख योगेश फाळके, उपतालुकाप्रमुख गणेश सावंत, "पश्चिम भागाचे जनसंपर्कातील प्रभावशाली नेतृत्व ज्येष्ठ लोकनेते बापूसाहेब शिंदे याचे विशेष मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना लाभले". दत्ताजी नवघने,दिलीप पवार ,प्रतीक काळे, पूर्व विभागाचे तालुकाप्रमुख अक्षय चव्हाण,विभागप्रमुख प्रताप भिलारे, सोपान चिकणे,दत्ता पोळ,नितीन चोरत ,सचिन वायदंडे , युवराज कोंढाळकर, उपतालुकाप्रमुख शाखाप्रमुख संघटक विभाग प्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणजित भोसले हे केवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नसून संघटनेच्या प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांना एकत्र जोडणारे संघर्षशील विचार व नेतृत्व देणारे खरे युवा जननायक ठरत आहेत त्यांच्या कार्यातून वाई खंडाळा आणि महाबळेश्वर परिसरात शिवसेनेची ताकद वाढत असून पक्षबांधणीसाठी दृढ पाया तयार होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा