शिरूरच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीची दरवर्षी प्रमाणेच उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

दोन्ही वर्गांच्या निकालात मुलींची बाजी

Pharmacy College Results, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त सीताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी शिरूर हे पुणे जिल्हातील एक नावाजलेले महाविद्यालय असून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. 

प्रथम वर्षाचा निकाल ९६% व द्वितीय वर्षाचा निकाल ७१% लागला या परीक्षेत प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये कु. पंचमुख पायल धनंजय ८१.७०%, इचके श्रद्धा चंद्रकांत ८१.६०%, कु.आवटे कृतिका कैलास ८०.६०% व द्वितिय वर्षामध्ये कु.दौंडकर साक्षी  संभाजी ८४.५५%, कु.लगड अपर्णा बाबासाहेब ८३.८२%,   कु.परमार खुशबू पारस ८१.९१% यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रजी थिटे, सचिव श्री.धनंजयजी थिटे डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ.अमोल शहा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !