मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक - प्रणव परिचारक

पंढरपूर शहरात 11वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

International Yoga Day, pranav paricharak, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)  

पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय आणि उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणवजी परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी6.30 ते 8.00 या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहाने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमास युवक नेते प्रणव परिचारक, सचिन इथापे (प्रांताधिकारी पंढरपूर), सचिन लंगोटे (तहसीलदार पंढरपूर), पंचायत समिती पंढरपूर कर्मचारी वृंद, पंढरपूर शहर पोलीस प्रशासनचे PSI श्री संजय मुळे, महिला PSI मोनिका खडके पाटील, PSI सुप्रिया रावण, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य धीरज कुमार बाड व त्यांचे प्राध्यापक वृंद,  पंढरपूर शहर भाजप अध्यक्ष लाला पानकर , भाजप प्रभारी अक्षय वाडकर, भाऊ टमटम, आकाश आरकिले हे उपस्थित होते.

पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी डॉ.संजय देशपांडे, युवा ता.प्रभारी लखन पडळकर, योगशिक्षक मिलिंद वाईकर, गिरीश अडवलकर, पुरुष व महिला साधक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमापूजनाने झाली. सदर कार्यक्रमात जेष्ठ योग शिक्षक श्री सुधीर आडवळकर यांच्या प्रार्थनेने झाली व योगाचे प्रात्यक्षिके भारत स्वाभिमान सोलापूर जि.प्रभारी श्री सुरेंद्र पिसे यांनी करून दाखविले व करून घेतले तसेच योगशिक्षक सोलापूर जि.सोशल मीडिया प्रभारी मधुकर सुतार यांनी आसनाचे व प्राणायामाचे लाभ व फायदे आणि करताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबतची माहिती व मार्गदर्शन सहभागी साधकांना केले.

तसेच युवा नेते श्री प्रणव जी परिचारक व माननीय तहसीलदार श्री सचिन लंगोटे आदींनी मनोगत व्यक्त केले..पतंजली समितीमार्फत सर्वांचे आभार मानून शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !