मलकापूर पांगरा मंडळामधील सरसकट सर्वे करा - आमदार मनोज कायंदे यांचे निर्देश
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा. मंडळातील झोटिंगा, देऊळगाव कोळ, आगेफळ,कोनाटी, व कुंबेफळ या गावांमध्ये काल झालेल्या ढगफुटी सदृश भागाची पाहणी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांनी थेट बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
काल झालेल्या प्रचंड पावसामुळे येथील नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण करत परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचा अक्षरशः विनाश झाला आहे, विहिरी खचल्या, उभे पिके वाहून गेली असून, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आसमानी संकटाच्या कहराने आणि शेतकऱ्यांचे डोळ्यातील आसवे बघून आमदार ही गहिवरले त्यांनी लगेच सोबत असलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी मलकापूर पांगरा सर्कलमधील सरसकट तात्काळ सर्वे करा असे निर्देश दिले.
काल ढगफुटी सदृश्य मलकापूर पांगरा सर्कल मध्ये 107 मिमी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.झोटिंगा गावातून देऊळगाव कोळकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहून गेल्यामुळे गावाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ५०० मीटर पर्यंत पाणी शिरले होते. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतामधील पाईपलाइनसह सिंचनासाठी वापरण्यात येणारे स्प्रिंकलर सेटही वाहून गेले आहेत. आमदार मनोज कायदे यांनी पाहणी केल्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश व तसेच ज्या ठिकाणी विहिरी खचलेल्या आहेत त्या विहिरीचे सुद्धा पंचनामा करण्याचे निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी महसूल प्रशासनाला दिले.
या पाहणी दरम्यान आमदार मनोज कायंदे बळीवंशचे चळवळीचे नितीन कायंदे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गट विकास अधिकारी अंकुश म्हस्के मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे, ग्राम महसूल अधिकारी जयसिंग राठोड श्रीकृष्ण निकम, प्रभाकर बावस्कर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर, सहायक कृषी अधिकारी खंडू चौधरी, दीपक जाधव सरपंच अशोक वाघ सरपंच अशोक कायदे सरपंच परमेश्वर खंदारे यांचे सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा