आसरे गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आसरे गावच्या विद्यमान उपसरपंच संगिता सणस यांचे पती जगन्नाथ सखाराम सणस यांच्या दुचाकीचा झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. ग्रामपंचायतच्या कामानिमित्त ते वाई येथे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. त्यांच्या समवेत ग्रामपंचायत शिपाई साहेबराव सणस हे देखील होते.
अपघात इतका भीषण होता की, जगन्नाथ सणस यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना समजतात त्यांनी तातडीने हवालदार श्रीनिवास बिराजदार आणि प्रेमजीत शिर्के या दोघांना घटनास्थळावर पाठवले. पोलिसांनी अपघातात मुळे झालेली जगन्नाथ समाज यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा करून शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णात पाठवला आहे
जगन्नाथ सणस हे आसरे पंचक्रोशीमध्ये "नाना" या नावाने परिचित होते. ते सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय असून धोम-वेलंग-आसरे विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक म्हणून त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने आसरे गावासह पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा