शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात इशारा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना क्रिस्टल सीड्स, न्यूजिवुड सीड्स आणि गंगा कावेरी सीड्स प्रा.लि. या नामांकित कंपन्यांनी कॉटन सीड़स प्लॉट देत फसवले असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत सचिन नंदकिशोर मांटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज, दि.२७ जूनरोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार निवेदन देत, कारवाईची मागणी केली आहे.
शेतकऱ्यानी कॉटनच्या या प्लॉटसाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, रासायनिक खतं, मजुरी यावर सुमारे ५० हजार रूपये खर्च केला होता. मात्र काही दिवसांनी संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधीनी शेतकऱ्यांची संपर्क करून प्लॉट उपटून टाकण्याचे आदेश देत, झालेला खर्चही परत न देता पळ काढला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तक्रारदारांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे, शेतकऱ्यांना झालेला खर्च कंपन्यांनी भरपाई स्वरूपात त्वरित परत द्यावा, संबंधित कंपन्यांवर व प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तर शेतकऱ्यांचा स्पष्ट इशारा दिला आहे की, 'जर मागण्या मान्य न झाल्या नाहीत तर तालुक्यातील हजारो शेतकरी कृषी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, होणाऱ्या परिणामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल.
या निवेदनावर सचिन मान्टे, कैलास मेहेत्रे, श्रीधर मेहेत्रे, जगन काळे, कमलाजी मेहेत्रे, माधव मेहेत्रे, गजानन मेहेत्रे, सतिश आढाव, प्रदीप मेहेत्रे, खंडू मेहेत्रे, विष्णू राठोड आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. या प्रकारामुळे तालुक्यातील शेतीविश्वात संतापाची लाट उसळली असून, कृषी प्रशासनासमोर कठीण आव्हान निर्माण झाले आहे. आता कृषी विभाग यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा