सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे करण्यात आली सवाऱ्यांची स्थापना
शिवशाही वृत्तसेवा, अजिंठा (प्रतिनिधी मजहर पठाण)
हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक आणि मुस्लिम समाजाच्या पवित्र मोहरमच्या सणाला २७ जूनपासून प्रारंभ झाला असून इस्लामिक नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अजिंठा येथे गेल्या अनेक वर्षापासून परंपरा आहे. हिंदू मुस्लिम मोहरमनिमित्त सवाऱ्या बसवतात. ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. मंगळवारी १ जुलै रोजी अली अब्बास, नाले हैदर, मैला अली, चाद साहाब, पंजा, हुसेनी आलम सवारीची स्थापना होणार आहे. दरम्यान गावासह परिसरात यंदाही ६० ते ६२ सवाऱ्यांची प्रतिष्ठापना होणार आहे. इमामवाड्यात नाले हैदर पंजाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर शिवना गेट, जामा मस्जिदजवळ, खडक मोहल्ला, तसेच त्रिपोला आदी परिसरात बडे नाल साहाब, छोटे नाल साहब, मौलाली सहाब सर्व सवाऱ्यांची स्थापना होईल.
६ जुलै रोजी पारंपरिक पद्धतीने होणार विसर्जन
मोहरम पर्वातील सातव्या व आठव्या दिवशी म्हणजे गुरुवारी ३ जुलै रोजी आणि शुक्रवारी ४ जुलै रात्री बडे नाल साहब, टप्पा सवारी हे नाले हैदर सवाऱ्यांना भेटीसाठी बाहेर पडणार असून ५ जुलै रात्री सर्वच सवाऱ्याची गावात मिरवणूक होईल. रविवारी ६ जुलै रोजी मोहरम असून या दिवशी सकाळी नाले हैदर, ताजिया, बुरख बिबी या स्वाऱ्याची पारंपारिक पद्धतीने विसर्जन होणार आहे.
उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा
अजिंठा येथे गेल्या दीडशे वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव मोहरम सणाच्या निमित्ताने सवाऱ्या बसवतात. या परंपरेपासून चार दिवस चालणाऱ्या साऱ्यांच्या उत्सवात गावातील ठिकठिकाणी मंडप टाकण्यात येतो. चार दिवसाच्या उत्सवामध्ये पहिल्या दिवशीच्या रात्री गावातून सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात येते. दुसऱ्या दिवशी नवस तसे तिसऱ्या दिवशी रात्री सवाऱ्यांची मिरवणूक काढली जाते. चौथ्या दिवशी दुपारपासून शेवटची ताज्या मिरवणूक काढून शहरातील गांधी चौकातील परिसरात सुमारे ६० ते ६५ पर्यंत स्वरांची सांगता होते. नंतर दुपारी तीन वाजता विसर्जनाला सुरुवात होते.
सवाऱ्यांची पोलिस दप्तरी झाली नोंद
६ जुलै रोजी मोहरम विसर्जनाच्या सवाऱ्या पाण्यासाठी मध्यप्रदेश, ब-हाणपूर, गुजरात, बडोदा, मुंबई, नागपूर, अकोला, जालना धुळे, छत्रपती संभाजीनगर येथून शेकडो संख्येत भाविक अजिंठा येथे येतात. अजिंठा येथे सुमारे ६० ते ६५ सवाऱ्या दरवर्षी बसविल्य जातात. त्यांची रितसर पोलिस दप्तरी नोंद करून घेतली जाते. यापैकी काही सवाऱ्या मानाच्या आहे. हिंदू-मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा