राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर, (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावच्या हद्दीत हॉटेल धनश्री मध्ये विना परवाना देशी दारूची विक्री करत असताना छापा टाकून देशी दारू सह 3 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे मागील वर्षभरापासून अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, ठिकठिकाणी दारू विक्री केली जात होती.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौजे खेडभोसे गावच्या हद्दीत हॉटेल धनश्रीमध्ये जाऊन अचानक छापा टाकला असता सिद्धेश्वर ब्रम्हदेव जमदाडे (वय 36, वर्ष रा. शेवते (खेडभोसे) ता. पंढरपूर जि. सोलापूर) हा त्याच्या कब्जामध्ये एक वायरची पिशवी घेऊन बसलेला दिसून आला सदर इसामाचा संशय आल्याने सदर इसमास जागीच पकडून त्याच्या ताब्यातील वायरच्या पिशवीची झडती घेतली असता वायरच्या पिशवी मध्ये 180 मिलीच्या देशी दारू संत्रा स्पेशलच्या 30 सीलबंद बाटल्या व विदेशी दारू डॉक्टर ब्रॅडी या बॅन्डच्या 180 मिलीच्या एकूण 10 सीलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास देशी दारू व विदेशी दारू जवळ बाळगण्या बाबत व विक्रीकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील विधीग्राह्य अनुज्ञप्ती, परवाना इ. कागदपत्रे आहेत का याबाबत चौकशी केली असता त्याने त्याबाबत सदर कागदपत्रे नसल्याचे सांगितले.
सदर आरोपीत इसमास अवेचे विक्रीकरीता देशी दारू व विदेशी दारू त्याचे कब्जात बाळगल्याने सिद्धेश्वर जमदाडे याच्या विरूध्द राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूरचे सहायक दुय्यम निरीक्षक जी. व्ही.भंडारे यांनी फिर्याद दिली आहे. या इसमाच्या ताब्यातून दारुबंदी गुन्ह्यातील जप्त केलेला 3,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पंढरपूर यांचे न्यायालयात हजर रहाणे बाबत भा नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35 (3) (4) अन्वये नोटीस देऊन सदर आरोपीस घटनास्थळी दिले. सदर आरोपीत इसमास अवैध विक्रीकरीता देशी दारू त्याचे कब्जात अवैधरित्या बाळगणे, दारुबंदी कर आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम 65 (E), 90 व 103 फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कुंभार हे करत आहेत.
दारू विक्रेत्यांचे दुकान पाडा
खेडभोसे गावात अवैध दारू विक्री करण्यात येत असून पोलिस प्रशासन यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. आता या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे आतातरी गावातील अवैध दारू विक्री बंद होईल, अवैध दारू विक्री करणारे विनापरवाना दुकान पाडून टाकावे, अशी आशा गावातील महिला व्यक्त करीत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा