वाळू तस्करीच्या वादातून खून झाल्याचा संशय - पोलीस तपास सुरू
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव शिवारात जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलिस ठाणेहद्दीतून अपहरण झालेल्या राजाटाकळी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील युवकाचा मृतदेह आज (दि. २९) सकाळी तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात भयाचे वातावरण पसरले होते. सुरेश तुकाराम आर्दड असे या मृत युवकाचे नाव असून, वाळूतस्करीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी सुरेश आर्दड याचा निघृण खून करून मृतदेह किनगावराजा पोलिस ठाणेहद्दीतील ताढेगाव परिसरात आढळून आले.
सविस्तर वृत्त असे की सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला एक युवक मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. परंतु, आज अधिक तपासादरम्यान या युवकाची ओळख पटली. सुरेश तुकाराम आर्दड, रा. राजा टाकळी, ता. घनसावंगी, जि. जालना असे या युवकाचे नाव आहे.
त्याच्या खुनासाठी अपहरणाची फिर्याद घनसावंगी पोलिस ठाण्यात २८ जून रोजीच दाखल झालेली आहे. अज्ञात मारेकयांनी या युवकाचे अपहरण केले व त्याचा निघृण खून करून मृतदेह किनगावराजा पोलिस ठाणेहद्दीत तढेगाव शिवारात रस्त्याच्याकडेला फेकून दिला. आता मारेक-यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान किनगावराजा व घनसावंगी पोलिसांसमोर आहे. किनगावराजाचे ठाणेदार एपीआय विनोद नरवाडे, पोहेकों. विष्णू मुंढे व पौशि सुभाष गीते हे अधिक तपास करत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा