आगीमुळे टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारहून पुण्याकडे इंडिगो कंपनीच्या गॅसच्या के ए 01 ए एच 7974 या टँकरला बोपेगाव तालुका वाईच्या हद्दीत रविवार दि. आठ जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे चालू टॅंकरला आग लागल्याचे कळताच टँकरच्या चालक समुभिरापान्डी आप्पात्रय नाडा, वय-५८ वर्षे, व्यवसाय - ड्रायव्हर, रा. सुप्रामनिपुरम ता. नांगुनेरी जिल्हा तिरुनेलवेली राज्य-तामिळनाडु यांनी प्रसंग सावधान बाळगून टँकर सर्विस रोडला घेऊन उडी मारली यामुळे यात चालक जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, व पीएसआय सुरज शिंदे, आप्पासाहेब कोलवडकर, सहाय्यक फौजदार अविनाश डेरे, नितीन जाधव, दत्तात्रय शिंदे त्यांचे सहकारी व जोशीविहीर महामार्ग पोलीस अधिकारी बी.सी. वंजारे, पीएसआय वाघमोडे, पो.हा. आवळे, मोरे, पो. ना. भोसले व त्यांचे सहकारी यांनी वाहतूक सुरळीत केल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला परंतु वाई नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी एक तास उशिरा आली व किसनवीर कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी ही नादुरुस्त असल्याने ती न आल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
महामार्गावर वेळे ते अनवडी दरम्यान वाहनांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत या ठिकाणी पोलीस केंद्र जोशविहीर व आनेवाडी येथे टोलनाका आहे परंतु दोन्ही ठिकाणी अग्निशामन यंत्रणा नसल्याने पोलीस व वाहनधारकांची ससेहोलपट होत असते व वाहन डोळ्यासमोर आगीत भस्मसात होताना वाहन चालकांना पाहावे लागते या ठिकाणी महामार्ग प्रशासनाकडून अग्निशमन यंत्रणा मिळावी अशी मागणी कित्येक वर्षापासून होत आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा