राज्यव्यापी कामगार एकता जनजागृती जनसंवाद अभियान
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
राज्यासह देशात कामगारांसाठी निर्माण झालेले कायदे कामगारांसाठी घातक असुन कामगार कायद्याच्या बदलासाठी व कामगारांच्या सुरक्षेसाठी कामगार दिनाचे औचित्य साधत जय कामगार चळवळीचे शरद पवळे यांनी राज्यव्यापी कामगार एकता जनजागृती जनसंवाद अभियान शिरूर येथे शिव सेवा मंडळ हॉल येथे कामगार प्रश्नांवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक आयोजीत करत दिप प्रज्वलन केले कामगारांच्या श्रमावर देशाची उन्नती समृद्धी आणि भविष्य अवलंबुन असुन त्यांच संरक्षण व सन्मान करणे हे प्रत्येक राष्ट्राचे कर्तव आहे या उद्देशाने कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार एकता जनजागृती जनसंवाद अभियान सुरू झाले.
यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या प्रश्नावर मनोगते व्यक्त केली औद्योगिक वसाहतीसह इतर क्षेत्रात काम करणारे कामगार यांच्यावर सरकारच्या कायद्यांमुळे झालेल्या बदलांमुळे असुरक्षित भयभित झालेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून होणार त्रास दुर व्हावा व कामगारांमध्ये निर्भयता यावी कंपनीसह इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार कायद्यांना सक्षम करून कामगारांच भविष्य उज्वल करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
लवकरच कामगार कायद्यात बदल करण्यासाठी सरकारला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर शिरूर तालुक्यात लवकरच भव्य कामगार मेळावा घेवून राज्यभर जय कामगार चळवळ पोहचवून कामगारांना आधार देवून निर्भय कामगार उभे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला यावेळ जय कामगारच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे,सुदाम इसे संदीप ढवळे शिवाजी साके विजय शेलार बबन अलभर संतोष पठारे ऋषिकेश टेमगिरेसागर टेमगिरे दत्तात्रय बांगर सचिन शेळके संजू भाऊ सोनवणे सतीश सोनवणे हरी सोनवणे नामदेव साठार प्रशांत कोतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा