वाई येथे आयोजित दासबोध ग्रंथाचा सांगता समारंभ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथे आयोजित स्पंदन हेल्थकेअर आणि दत्तात्रय पांडुरंग मेनबुदले प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित दासबोध ग्रंथाच्या सांगता समारंभ आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून परमपूज्य मोहन बुवा रामदासी होते. दासबोधाचे गाढे अभ्यासक, प्रचारक म्हणून त्यांची ओळख आहे. दासबोध मांडलेले तत्त्वज्ञान जीवनासाठी किती महत्त्वाचा आहे याविषयी प्रतिपादन केले.
कोणत्याही गोष्टीची उपासना ती मनापासून करता आली पाहिजे. तरच त्या उपासनेला अर्थ आहे असे उद्गार काढले. स्पंदन हेल्थकेअर च्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून दररोज सकाळी नऊ ते सव्वानऊ या वेळेमध्ये दासबोधाचे वाचन केले जाते. हे दासबोधाचे वाचनाचे कार्य डॉक्टर राहुल पोद्दार सर गेले तीन वर्ष अखंड करत आहे. त्या कार्याप्रती प्रमुख मान्यवरांच्या हातून त्यांचा सत्कारही करण्यात आला त्यातून रुग्णालयामध्ये आणि रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक लहरी निर्माण होण्याचं काम होत आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी स्पंदन हेल्थकेअर चे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे उद्गार रामदासी यांनी काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ष. ब्र. 108 ज्ञान भास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज हे होते. त्यांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी डॉक्टर यांना रामदासी महाराजांनी प्रसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मेनबुदले यांनी केले. स्वागत श्रीमती कमल मेनबुदले व सूर्यकांत वालेकर यांनी केले. सूत्रसंचालन केशव कोदे यांनी केले. आभार दीपक बागडे यांनी मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा