रामलिंग ग्रामपंचायत येथे कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
रामलिंग ग्रामपंचायत येथे कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले. रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रामलिंग ग्रा.पंचायत मध्ये अनेक कामे प्रामुख्याने केली जातात त्यात स्वच्छ्ता करणे,पाणी सोडणे, दिवाबत्ती, झाडांचे संगोपन यासारखे अनेक कामे कामगार प्रमाणिक पणे करत असतात ,या दिवशी त्यांचा दिवस म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. कारण कामगार यांचे स्थान प्रत्येक कामाचा ठिकाणी खूप उच्च आहे, त्यांचा विषयी आदर सर्वांनी बाळगला पाहिजे म्हणून त्यांना आज शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
१ मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.याच दिवशी कामगारांनी स्वतःचा हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबून हा दिवस साजरा केला जातो.
यावेळी रामलिंग ग्रा .सरपंच - शिल्पा गायकवाड,उपसरपंच - सचिन घावटे, मा.उपसरपंच - यशवंत कर्डिले, उद्योजक - विठ्ठल जगदाळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष - विजय दौंडकर,रमेश कर्डिले,ग्रामसेवक - केदारी, भाऊसाहेब, मुख्याध्यापिका - सुनिता जगताप,सर्व शिक्षक वृंद,मांजरे मॅडम,टोणगे मॅडम,जगदाळे सर,निकिता देव्हाडे,अर्चना माने, ग्रा.कर्मचारी महाजन भाऊ,नारायण गायकवाड, स्वप्नील गायकवाड,अविनाश गोसावी,योगेश माने,छाया ढवळे अनेक मान्यवर उपस्थित होते. रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा - राणी कर्डिले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा