जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात शरद पवारांना आणखी एक धक्का
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई बावधन गाव हे सातत्याने राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहिले आहे. बावधन गावाच्या निर्णयाने काय होऊ शकत हे आपण वाई नगरपालिकेत मध्ये बघितलं आहे. वाई नगरपालिका ताे झाकी हे, जिल्हा परिषद-पंचायत समिती अभी बाकी हे, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे यांनी दिला आहे. बावधन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते शशिकांत पिसाळ आणि विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यासह वाई खंडाळा महाबळेश्वर मधील अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहिर प्रवेश संपन्न झाला, या प्रसंगी ते बाेलत हाेते.
याप्रसंगी माजी आमदार मदनदादा भाेसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, चिन्मय कुलकर्णी, नगराध्यक्ष अनिल सावंत, सचिन भाेसले, दिपक ननावरे, डी. एम. बावळेकर, राेहिदास पिसाळ, काशिनाथ शेलार, प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
मंत्री जयकुमार गाेरे पुढे म्हणाले, वाई तालुक्याचे राजकारण गेली अनेक वर्षे सातत्याने राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. या तालुक्यात जे घडते, त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी धाडसी निर्णय घेतले आणि त्या निर्णयांनी राजकीय इतिहास घडवला आहे. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल सावंत यांच्या विजयामध्ये शशिकांत पिसाळ यांचा माेलाची वाटा आहे. विशेषतः पिसाळ कुटुंबाने सुरुवातीपासून घेतलेली भूमिका ही परिवर्तनाची नांदी ठरली, हे विसरता येणार नाही.
२०१४ सालापासून भारतीय जनता पक्षाची लाट देशात आणि राज्यात सुरू झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात विकासाची नवी दिशा मिळाली. गावागावांत रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये मोठा बदल जनतेने अनुभवला आहे. म्हणूनच देशातील आणि राज्यातील जनता प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आहे.
या जिल्ह्याने माननीय शरद पवार साहेबांवर प्रचंड प्रेम केले. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सहकारी संस्था याठिकाणी त्यांना ताकद देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र आजपर्यंत या जिल्ह्याला त्यांनी काय दिले, याबाबत कुणीही ठामपणे सांगू शकले नाही. या जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे मोठे परिवर्तन घडले. याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या भागात झालेली विकासकामे प्रत्येकाने प्रत्यक्ष पाहिली आहेत. म्हणूनच माझी या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती आहे की, भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल. भाजपमध्ये येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा केवळ संख्या वाढवणारा नसून, परिवर्तनाचा भागीदार असेल.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात ही निवडणूक परिवर्तनाची संधी आहे. तुमच्या मनात जो उमेदवार आहे, जो खरोखर काम करणारा आहे, जो जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतो – त्यालाच पुढे आणा. यापूर्वी घडवलेला इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे. या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वांनी एकत्र सहभागी व्हावे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे सक्षम प्रतिनिधी निवडून द्यावेत, हीच अपेक्षा आहे.
मी या व्यासपीठावरून ठामपणे सांगतो की, मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. कुठली शक्ती कुठे काम करते, कोणाची किती ताकद आहे, हे आम्हाला माहिती आहे. मात्र महायुतीमध्ये असताना आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. माझा थेट संबंध नसतानाही या भागातील प्रत्येक प्रक्रियेत मी सातत्याने सहभागी राहणार आहे. असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
मदनदादा भाेसले म्हणाले, भविष्य काळात एक दिलाने काम करुन पक्षाला बळकटी देण्याचे काम केले जाईल. पिसाळ कुटुंबाबराेबर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकदिलाने काम करेल". तसेच विजयसिंह पिसाळ, अरूणादेवी पिसाळ यांची देखील यावेळी भाषणे झाली.
शशिकांत पिसाळ, माजी सभापती अरूणादेवी पिसाळ, विजयसिंह पिसाळ, दिप्ती पिसाळ, माजी. जि. प सदस्य दिलीप बाबर, खंडाळा सभापती एस. वाय. पवार, लाेकनेते बापूसाहेब शिंदे, बावधनच्या विद्यमान सरपंच वंदना कांबळे, प्रसाद सुर्वे, पश्चिम भागाचे कृष्णा नवघणे, अशाेक मांढरे, अशाेक पिसाळ, विठ्ठल पिसाळ, लक्ष्मण ननावरे, चंद्रकांत खराडे, महेश ननावरे, प्रदिप जायगुडे, विकास भाेसले, तानाजी यादव, विशाल राजपुरे, विकास यादव, अशाेक पिसाळ, गणेश बनसाेडे, चंद्रकांत मांढरे, वैभव कदम, प्रशांत कदम, महेंद्र कदम, सत्यजित कदम, सुनिल माने यांचा पक्षप्रवेश मंत्री जयकुमार गाेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
अंकीता कदम यांनी प्रास्ताविक केले. सुनिल कदम यांनी स्वागत केले. चंद्रकांत काेकाटे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक, वाई, खंडाळा, महाबळेश्वर परिसरातील कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



