राज्यभरातील ३८ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म /बी फार्म/ एम फार्म), इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेत राज्यभरातील ३८ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा , बी. व एम. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे, शिरूर एस. टी. सी. ओ. पी. एन. ॲल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबाजी गलांडे, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर येथील प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकऱ, गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी, वाघोली येथील प्राचार्य डॉ. तुषार शेळके, पुष्पराज कोळपकर, शितल खंडागळे मॅडम, डॉ. जे. पी. सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मसी क्षेत्रातील संशोधन, नाविन्यपूर्ण संकल्पना, आधुनिक औषधनिर्मिती प्रक्रिया आणि व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाविन्यपूर्ण मॉडेल्स विकसित करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्मार्ट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नवीन औषध वितरण प्रणाली, ऑस्मोटिक ड्रग डिलिव्हरी, बायोटेक्नॉलॉजी, नियंत्रित औषध मुक्तता प्रणाली तसेच फार्मास्युटिकल उपकरणे या विषयांवर आधारित विविध मॉडेल्स प्रस्तुत केल्या.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट नमुना ठरली.
या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून जे पी सूर्यवंशी, शितल खंडागळे, विशाल कारखिले, मोहन शितोळे यांनी काम पाहिले. परीक्षक मंडळाने प्रत्येक मॉडेलचे संकल्पना, कार्यपद्धती, सादरीकरण व उपयुक्तता या निकषांवर सखोल व निष्पक्ष मूल्यमापन केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाबाबत परीक्षक मंडळाने समाधान व्यक्त केले.
🏆 स्पर्धेचा निकाल
डि. फार्मसी विभाग:
प्रथम पारितोषिक: विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे – श्रद्धा चौधरी व तन्मय चव्हाण
द्वितीय पारितोषिक: अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर – पूर्वा गोरे व भाग्यश्री गुट्टेरकर
तृतीय पारितोषिक: मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, विरगाव – ऋषिकेश शेळके
उत्तेजनार्थ पारितोषिक: सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डि. फार्म), शिरूर – जगदाळे अनुश्का व थोरात श्रेया
बी. फार्मसी व एम. फार्मसी विभाग:
प्रथम पारितोषिक: सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर – रिया अग्रहरी व प्रणव बडगुजर
द्वितीय पारितोषिक: विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे – ओम खैरे व केतकी गोमसे
तृतीय पारितोषिक: AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे – अनुष्का साकोरे व तानिया घाणेकर
उत्तेजनार्थ पारितोषिक: प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, लोणी – अंजली पवार व तृप्ती सोनवंशी.
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५००/-, १०००/-, ७००/- रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणारी, तांत्रिक कौशल्यांना चालना देणारी आणि फार्मसी शिक्षण अधिक व्यावहारिक बनविणारी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, आयोजक समिती, स्वयंसेवक तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ .राजेंद्रजी थिटे व सचिव धनंजय थिटे, प्रमुख पाहुणे, प्राचार्य व परीक्षकांनी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.एकूणच हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



