विजयावर शिक्कामोर्तब करणारी वरकुटे–मलवडी सभा - सौ. सोनिया जयकुमार गोरे
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील वरकुटे–मलवडी येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अरुण (आबा) गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सभेला झालेली गर्दी, मतदारांचा उत्साह आणि विकासाभिमुख भाषण पाहता ही सभा गोरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या सभेत मनोगत व्यक्त करताना अरुण आबा गोरे म्हणाले की, कायम दुष्काळी असलेल्या माण–खटाव भागात पाणी आणण्याचे ऐतिहासिक काम झाले. आजवर कधीच न मिळालेला निधी विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आला. विकासकामे करताना जात-धर्म किंवा पक्षीय भेद न पाहता सर्वसमावेशक निर्णय घेतले गेले. नदीला पाणी सोडताना कोणत्या पक्षाचे शेत भिजेल, रस्ते करताना गाव किंवा सरपंच कोणत्या विचाराचे आहेत, हे कधीच पाहिले नाही.
उमेदवार बाहेरचा की स्थानिक, यापेक्षा विकासकामांचा विचार महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यांनी पुढील काळात विकासाचा “संपूर्ण पिक्चर” दाखवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. माण–खटावमध्ये एमआयडीसी उभारून स्थानिक तरुणांना इथेच रोजगार देण्यासाठी उद्योग, कारखाने व कंपन्या आणण्याची भूमिका त्यांनी मांडली आणि या कार्यासाठी मतदारांची खंबीर साथ मागितली.
यावेळी सौ. सोनिया गोरे, अर्जुन तात्या काळे, शिवाजीराव शिंदे, बाळकृष्णभाऊ जगताप, अतुलदादा जाधव, अतुलशेठ जाधव, दादासाहेब काळे, भाजपा माण तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, आप्पासाहेब पुकळे, ब्रह्मदेव पुकळे, युवराजकाका सूर्यवंशी, म्हसवड नगराध्यक्ष सौ. पूजा सचिन विरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो मतदार उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेशया पहिल्याच विराट सभेत कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील युवराजजी बनगर, बाळासाहेब जगताप, धीरज जगताप, उत्तमभाऊ, बबनराव काळे, माजी सरपंच नाथाजी काटकर, सिद्धेश्वर कुरोली येथील ग्रामपंचायत सदस्य अर्जुन देशमुख, व्हाइस चेअरमन अजय संभाजीराव देशमुख, तसेच प्रकाश, रमेश, उदय, प्रशांत, संभाजी, आमर देशमुख आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



