एक मे कामगार दिनाच्या औचित्याने पुरस्कार वितरण
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर शहरांमध्ये महावितरण येथे कार्यरत असणारे दत्तात्रय अशोक शिर्के यांना कामगार दिनानिमित्त गुणवंत तांत्रिक कामगार महावितरण बारामती परिमंडल येथे १ मे कामगार दिनानिमित्त बारामती परिमंडल मुख्याधिकारी धर्मराज पटेकर यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी शिरूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव व सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार मिळाल्याचे दत्तात्रय शिर्के यांनी यावेळी सांगितले. यावेळी महावितरणचे कर्मचारी लगड, कनिष्ठ लिपिक शिंदे, प्रणव भोईर, सागर नवले निशा ढाकणे लोहार मॅडम, सुमित आहीरे, नेवसे, निलेश आगलावे ,अशोक गुळादे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा