गुरुवारी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय किन्हई तालुका कोरेगाव येथील उपशिक्षक अजय रघुनाथ दिघे यांची माजी प्राचार्य एन्. आर. माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कारासाठी सन 2024 साठी निवड करण्यात आली आहे.
कर्मवीर विद्या प्रबोधिनीने गुरुवार दिनांक 8 रोजी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कार निवडीबद्दल अजय दिघे यांचे रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डी एन पवार विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे सह विभागीय अधिकारी एन टी निकम दिनेश दाभाडे तिन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर भोसले ॲड. अक्षय भाडळकर तसेच आंबेघर तालुका जावली येथील सर्व ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा