ग्रामीण सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी केलेल्या कार्याची दखल
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ व शकुंतला फौंडेशन यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील सामाजिक कार्यकर्ते नविंद्र जगताप यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तळेगाव ढमढेरे गावात साजरे होणारे सण उत्सव, विविध कार्यक्रम यात पुढाकार घेऊन ग्रामीण सांस्कृतिक परंपरा जपण्यास हातभार लावणाऱ्या व्यक्तीस आदर्श सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार दिला जातो.
नविंद्र जगताप हे तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गावात होणारा अखंड हरीनाम सप्ताह, गावचे वैभव असणारी हनुमान देवाची यात्रा, सार्वजनिक गणेशउत्सव यांच्या आयोजनात त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व विद्या सहकारी बँक पुणेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी हा पुरस्कार देण्यामागची भूमिका आपल्या मनोगतामधून व्यक्त केली. यावेळी अनिल ढमढेरे, अमोल घुमे, सचिन पंडित, प्राचार्य अशोक दहिफळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, प्रा. कुंडलिक कदम, रणजित तकटे, प्रदीप ढमढेरे, माऊली आल्हाट, रामदास ढमढेरे, सूर्यकांत महाराज जगताप,विजय घुले हे उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा