उद्योजक हनुमंतराव जगदाळे यांचे मतदारांना आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, ठाणे (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांच्या स्वप्नपूर्ती साठी बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके यांच्या पॅनलला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योजक हनुमंतराव जगदाळे यांनी केले आहे .
जी एस महानगर बँकेच्या दि. १ जून रोजी होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाणे सावरकर नगर येथील ठाकूर महाविदयालयात संस्थापक अध्यक्ष सॉ. गुलाबराव शेळके साहेब व श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके पॅनल च्या प्रचाराची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक हनुमंत राव जगदाळे हे होते . तर प्रमुख पाहुणे जी एस महानगर बँकेच्या अध्यक्ष सुमनताई गुलाबराव शेळके या होत्या.
हनुमतराव जगदाळे सभेला संबोधित करताना पुढे म्हणाले की , सॉलिसीटर गुलाबराव शेळके साहेब याच्या स्वपनपूर्तीसाठी श्रीमती सुमनताई शेळके यांच्या पॅनलला बहुमतानें विजयी करा . मुंबई महानगरातील चाकर मान्याच्या आर्थिक गरज पूर्तीसाठी कार्यरत असणारी आणि पारदर्शक कारभाराची, विश्वास प्राप्त आर्थिक व्यवहाराने उत्तरोत्तर प्रगतीचा इतिहास असणारी ही बँक आहे. ही बँक सुरक्षीत राहवयाची असेल , तर ती विदयमान अध्यक्ष श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहुन शेळके साहेबाचे स्वप्नपूर्ती होईल.
शेळके साहेब , उदयराव आणि स्वतः सुमनताई यांचा त्याग , त्यांचे वय याचा विचार करून, दिवंगत शेळकेसाहेब व उदयराव यांच्या निधनानंतर बँकेचा विचार करता निवडणूक व्हायलाच नको होती. पण एका विशिष्ट हेतूने एकत्रित आलेली ही मंडळी बँकेला अडचणीत आणल्या शिवाय रहाणार नाही. पण निरपेक्ष व कोणतीही अपेक्षा न उरलेल्या श्रीमती सुमनताईंच्या च हातात हीं बँक सुरक्षित राहील. हे एक प्रकारे मोठे धर्मयुद्धच असल्यामुळे याला सामोरे जाणे आवश्यक आहे. आता आपण कोणताहीं विचार न करता आपल्या धनुष्य बाणाचा मारा सुरु करून युद्धाला सुरवात केली पाहिजे. आज आपली उपस्थिती पाहता विजय आपलाच आहे. माझ्या परिसरातील सभासद मतदारांची जबाबदारी आमची आहे. ती आम्ही शेकडा १०० टक्के पार पाडून आपला विजय साजरा करू अशी खात्री देतो. म्हूणन उपस्थित सभासद मतदारांनी रिक्षा निशाणीवर रबरी फुलीचा शिक्का मारून सुमनताईंच्या पॅनलला बहूमताने विजयी करा , असे आवाहन ही जगदाळे यांनी केले.
या प्रसंगी बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके यांचा सत्कार करण्यात आला. सुमनताईनी सत्काराला उत्तर देताना रिक्षा चिन्ह असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या , असे अवाहन केले.
यावेळी विनायकराव भुसारे पाटील, विष्णू भगत, अर्जून राऊत, व सुभाष पटाडे यांनी मनोगत व्यक्त केले . या प्रचार सभेचे डॉ . राजेश डेरे यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचलन केले. त्यानंतर सर्व उमेदवाराचा परिचय करून देण्यात आला. शेवटी राष्ट्रगीत होऊन सभा संपन्न झाली .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा