६ वर्षाच्या मुलासह अनेक जणांना चावा घेतल्याने परिसरात दहशत
शिवशाही वृत्तसेवा, शिरुर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरुर शहरातील गुजरमळा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी ६ वर्षाच्या मुलासह अनेक जणांना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शिरूरचे मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक महिला व नागरिकांनी केली आहे.
याबाबत महिला व नागरिक नगरपरिषदेच्या विरोधात आक्रमक झाले असून, दि. २५ मे रोजी, २ पिसाळलेल्या कुत्र्यांनी खेळत असलेल्या ६ वर्षीय ईशांत राजेंद्र दारोळे याच्यावर जीवघेणा हल्ला करत चावा घेतला. त्याला जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या परिसरात २ कुत्र्यांनी उन्माद मांडला असून आत्तापर्यंत १५ते २० पेक्षा अधिक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या घटनेनंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. यावेळी शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे माजी सभापती विठ्ठल पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता बोरुडे , सविता वाबळे, संध्या दारोळे , छाया यादव ,धनश्री मच्छिंद्र कदम, नंदा संतोष नवले, राजश्री रोकडे, सिंधू सोमनाथ पळसकर, पूजा भास्कर हरिहर , प्रीती प्रकाश बनसोडे ,पूजा भोंडवे ,सुप्रिया गावडे ,रश्मी जगदाळे, नितीन यादव ,आशिष पळसकर, दत्तात्रय शेलार, महेश कुरंदळे, महेश पठारे ,सुहास वाबळे आदी उपस्थित होते.
सामजिक कार्यकर्त्या सविता दारोळे म्हणाल्या की माझा भाचा ईशांत हा काल घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेली कुत्री आली व त्यांनी ईशांतचा चावा घेतला .यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली असून, एखादा अनुचित प्रकार होण्याची वाट नगर परिषद पाहते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक रहिवासी सविता वाबळे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी माझ्या ही मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. मोकाट व अनिर्बंध कुत्र्यांच्या संख्येमुळे मुले घराबाहेर येऊ शकत नाहीत. कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने केला पाहिजे.
सविता भोंडवे यांनी सांगितलं की माझ्याही मुलाला काही दिवसापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता .वारंवार गुजर कॉलनी परिसरातील मोकाट कुत्रे मुलांना व जेष्ठ नागरिकांना चावे घेतात याबाबत नगरपरिषद गांभीर्याने उपाययोजना करावी.
शिरुर नगर परिषदेचे माजी सभापती विठ्ठलराव पवार यांनी सांगितले की गुजर मळा परिसरात गेल्या काही दिवसापासून १७ जणांना कुत्र्यानी चावा घेतला असून, गुजर मळा परिसरातील दोन पिसाळलेली कुत्रे ही लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चावतात .या कुत्र्यांच्यामुळे कोणाच्या बळी गेल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला.
मोकाट कुत्र्यांच्या उम्मादा मुळे जेष्ठ नागरिक व लहान मुले यांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी. गुजर कॉलनीतील देवांश पळसकर वय -६ याला दोन वर्षात तीन वेळा कुत्रे चावले .तर श्रेयस पोटे , महादेव चव्हाण , शंभूराजे शेलार , वंश वाबळे , ईशा रावडे , संदेश भोंडवे , मयूरेश कदम , आयुष हरिहर ,दरेकर आजोबा (वय८०) गौरव गिरमकर ,यांनाही काही दिवसापूर्वी गुजर कॉलनीत कुत्रे चावल्याचे पवार यांनी सांगितले .
सामजिक कार्यकर्त्या सविता दारोळे म्हणाल्या की माझा भाचा ईशांत हा काल घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेली कुत्री आली व त्यांनी ईशांतचा चावा घेतला .यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली असून, एखादा अनुचित प्रकार होण्याची वाट नगर परिषद पाहते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्थानिक रहिवासी सविता वाबळे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी माझ्या ही मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. मोकाट व अनिर्बंध कुत्र्यांच्या संख्येमुळे मुले घराबाहेर येऊ शकत नाहीत. कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने केला पाहिजे .
सविता भोंडवे यांनी सांगितलं की माझ्याही मुलाला काही दिवसापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता .वारंवार गुजर कॉलनी परिसरातील मोकाट कुत्रे मुलांना व जेष्ठ नागरिकांना चावे घेतात याबाबत नगरपरिषद गांभीर्याने उपाययोजना करावी .
शिरुर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे माजी सभापती विठ्ठलराव पवार यांनी सांगितले की गुजर मळा परिसरात गेल्या काही दिवसापासून १७ जणांना कुत्र्यानी चावा घेतला आहे. गुजर कॉलनी परिसरातील एक काळ्या रंगाचे व एक पांढऱ्या रंगाचे अशी दोन पिसाळलेली कुत्रे ही लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चावतात .या कुत्र्यांच्यामुळे कोणाच्या बळी गेल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला
याबाबत पालिकेचे स्वच्छता अधिकारी शिरूर शहरातील मोकाट कुत्र्यांवर मागील दोन वर्षापासून कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्यासाठी प्रयत्नही केले होते परंतु काही त्रुटी अभावी ही मोहीम यशस्वी करण्यात प्रशासनाला अपयश आले होते. परंतु हा प्रकार अतिशय घातक व गंभीर असून त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी यांनी दिले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा