दरडप्रवण व पुरप्रवण क्षेत्रात जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी उपाययोजना
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाबळेश्वर तालुक्यातील संभाव्य दरडप्रवण व पुरप्रवण क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या एकूण 26 गावामध्ये दरड कोसळून किंवा अचानक पूर आल्यावर शोध व बचाव पथक शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांना तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अधिकारी,कर्मचारी, युवक मंडळातील सदस्य, अशासकीय संस्थाचे सदस्य यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व दरडी कोसळयापूर्वी निसर्गाकडून प्राप्त झालेले संकेत ओळखणे तसेच गावस्तरीय शोध व बचावासाठी वितरीत केलेले साहित्य वापराबाबत यशदा पुणे येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनचे मास्टर ट्रेनर यांनी मौजे कुंभरोशी व मौजे तापोळा येथे दरड प्रवण व पूरप्रवण गावातील गाव स्तरावरील गठीत केलेली समिती मधील सर्व सदस्य, सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम महसूल अधिकारी,ग्रामसेवक, पोलिस पाटील, कृषीसेवक कृषीसहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, वन पाल, आपदा मित्र , युवक मंडळातील सदस्य, उत्कृष्ट पोहणारे युवक, रेस्क्यु टिम, ट्रेकर्स व इतर ग्रामस्थ यांना प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणामध्ये दरडप्रवण व पुरप्रवण भागामध्ये दरडी कोसळणेच्या अनुषंगाने पुर्व संकेत ओळखणे तसेच आवश्यक त्या खबरदारीच्या उपायोजने बाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत आले तसेच सर्पदंश झालेस प्रथमोपचार तसेच गॅसगळती होणे, आग लागणे याबाबत तातडीचे करावयाचे उपायोजनेचे प्रशिक्षण व अपघात ग्रस्त परिस्थीती उद्भवल्यास करावयाचे उपायोजना याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले. सदर प्रशिक्षण बाबतचे नियोजन विनोद सावंत, नायब तहसिलदार तहसिल कार्यालय महाबळेश्वर व तहसिल कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा