maharashtra day, workers day, shivshahi news,

मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील वीज वितरणचे 54 विद्युत पोल मोडून कोसळल्याने लाखोचे नुकसान

कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे

Power supply collapse, heavy rain, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

गेल्या २० दिवसा पासुन वाई तालुक्याच्या डोंगर दर्या खोर्यातील गावांमध्ये विजांचा लखलखाट ढगांचा गडगडाट आणि सुसाट वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यासह पडत असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका वाईच्या विज वितरण विभागाला बसल्याने या विभागातील गावा गावातील लाईटच्या खांबानवर झाडे कोसळल्याने अंदाजे ५४ सिमेंट पोलसह लोखंडी पोल देखील मोडुन जमीनीवर कोसळल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे आणी त्यांचे सहकारी असलेले कार्यकारी उप अभियंता गणेश कोदे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की गेल्या दहा दिवसां पासून वाई तालुक्यातील गावांन मध्ये मानसुन पुर्व वळीव पावसाने अचानक पणे आपले सहकारी साथीदार ढगांचा गडगडाट विजांचा लखलखाट आणी सुसाट वेगाने वाहणारे वारे यांना सोबत ‌दिवस रात्र अक्षरशा झोडपून काढल्याने जमीनीत पाणी मुरत गेल्याने विद्युत वाहक तारांना सोबत घेऊन वर्षानुवर्षे गावा गावातील जनतेला २४ तास प्रकाश देण्यासाठी आणी शेतकऱ्यांच्या भुकेल्या पिकांना पाणी देण्यासाठी उभे असणारे सिमेंट व लोखंडी पोल भोवती असणाऱ्या मातीच्या भराव्यात पोकळी निर्माण झाल्याने लगत असणारी विविध प्रकारच्या झाडांना वाऱ्याने हिसका दाखवल्याने ति झाडे आणी आणी बेसुमार पणे वाढलेल्या त्यांच्या फांद्या या जवळपास ५४ पोलवर पडल्याने हे पोल मोडुन जमीनीवर कोसळल्याने तालुक्यातील असंख्य गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जिवना आवश्यक असणाऱ्या पिठाच्या गिरण्या व गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या बंद राहिल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला तर अनेक गावे अंधाराचा सामना करत रात्र काढताना दिसत होती.
कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे व उप अभियंता गणेश कोदे अधिक माहिती देताना म्हणाले कि दरवर्षी वाई तालुक्यातील डोंगर दऱ्या खोऱ्यानसह पठारावरील गावांना पावसाळ्यात सुरळीत आणी अखंडीत पणे विजपुरवठा करण्या साठी तालुक्यातील वाई शहर वाई ग्रामीण बावधन व्याहळी केंजळ सुरुर कवठे भुईंज जांब पाचवड या गावांन मध्ये आमच्या शाखा अभियंत्यांची कार्यालये आहेत.त्या त्या कार्यालयात नेमणुका केलेलें शाखा अभियंता हे सक्षम आणी कार्यक्षम अधिकारी आहेत त्यांच्या कडे आपत कालीन परस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य आहे आमच्या कडे नक्कीच माणसीकबळ कमी आहे पण असणाऱ्या बळावरच तालुक्यातील सर्व शाखा अभियंता कर्मचाऱ्यांना दररोज सोबत घेऊन पोल भोवती असणारी झाडे झुडपे आणी वेली तोडण्याचे काम एक महिना अगोदरच करत असताना दिसतात . त्यामुळे भर पावसात देखील आमचे अधिकारी आणी कर्मचारी प्रसंगी प्राणांची बाजी लावून आप आपल्या बिट मधील गावे अंधारात राहणार नाहीत याची खबरदारी आणी काळजी घेतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. असे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे आणि उपअभियंता गणेश कोदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
तालुक्यात निसर्ग कोपामुळे केंजळ बालेघर रेणुसेवस्ती अनवडी गोवेदिघर चिंधवली असले जांब विरमाडे शहाबाग बावधन पसरणी आणी वाईतील तामजाई नगर या गावातील कोसळलेले विद्युत पोल तातडीने भरपावसात नवे पोल आणुन युद्ध पातळीवर उभे करुन खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास आम्हाला यश आले आहे .वाई तालुक्यातील विद्युत ग्राहकांना तातडीची सेवा देण्यासाठी वाईचे कार्यकारी अभियंता कार्यालय कटीबद्ध आहे असा विश्वास देखील शिवतारे यांनी दिला आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !