यात्रेची सर्व तयारी पूर्ण - अध्यक्षा सुनिता पोटघन यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असुन श्री काळभैरवनाथ देवस्थान चे ११३ गावे मानकरी आहेत. अहिल्यानगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातून प्रामुख्याने भाविक येत असतात तसेच राज्यभरातून भाविक येत असतात. यात्रा उत्सव शनिवार दि. १२ एप्रिल ते १३ एप्रिल या काळात असुन मुख्य . यात्रा १२ तारखेला आहे. दि. ११ रोजी रात्री १० वाजता मुख्य मानकरी पानोली व पळवे खुर्दु ची पालखीचे मध्ये आगमन होते. सकाळी ५: ३० वाजता अभिषेक करून यात्रा उत्सवाला सुरुवात होईल.
दिवसभर पालखी व मानाच्या काठ्या व कावडीचे आगमन होते. रात्री १० नंतर पालखी मिरवणुक व शोभेची दारू उडवली जाते पालखी मध्ये मुख्य मानकरी पानोली, पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण या गावच्या पालखी मिरणूकीत शोभेची आतिषबाजी होते. पाच वेगवेगळ्या रस्त्यांनी पाच गावच्या पालखी येतात जोगेश्वरी मंदिरासमोर मिरवणूक होऊन मंदिराकडे पालखी मिरवणुक जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मानाच्या काठ्या व कावडची मिरवणूक होते व यात्रा उत्सवा ची सांगता होते. यात्रेनिमित्त जवळ जवळ तीन लाख भाविक काळ भैरवनाथाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सुनिता विठ्ठल पोटघन यांनी दिली.
काळ भैरवनाथ देवस्थान परिसर विकासासाठी सर्व विश्वस्त प्रयत्नशिल आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्षा सुनिता पोटघन, उपाध्यक्ष सुरेश बोरुडे सर, कार्याध्यक्ष विजय जगताप, खजिनदार शिवाजी भगत, सचिव सचिन ढोरमले, सहसचिव विशाल फटांगडे सह खजिनदार सविता ढोरमले, मा सभापती व विश्वस्त गणेश शेळके, जयसिंग धोत्रे, दत्तात्रय ढोरमले, सोनाली ढोरमले, रुपाली पोटघन, निर्मला कळमकर, गणेश वाखारे यांनी दिली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा