कवी डॉ.विशाल इंगोले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे ६ एप्रिल, रविवारी गीतांजली मंगल कार्यालयात आयोजित स्मृतीशेष कवी डॉ.विशाल इंगोले स्मृती साहित्य पुरस्कार-२०२५ वितरण कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात देशमुख बोलत होते. आजच्या काळात अति शिकलेल्या माणसाचं अडाणीपण हीच खरी सामाजिक समस्या असल्याचे प्रतिपादन बोलावे ते आम्हीच ह्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक तथा कवी व विचारवंत श्रीकांत देशमुख यांनी केले.
यावेळी मेहकर विधानसभाचे आमदार सिद्धार्थ खरात, सेवासंकल्प प्रकल्पाचे संस्थापक नंदकुमार पालवे, पुरस्कारार्थी प्रवीण तुराणकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, गजानन घिरके आदि तर प्रमुख अतिथीचे पुस्तक देवून स्वागत केले. कार्यक्रमाचा प्रारंभतुळसी वृंदावनाच्या जलपूजनाने करण्यात आला. तर प्रमुख अतिथिचे स्वागत पुस्तके देऊन करण्यात आले. राजुरा, जि. चंद्रपूर येथील पुरस्कारार्थी कवी, लेखक, निवेदक, प्रवीण तुराणकर यांचा परिचय प्रा. मधुकर जाधव यांनी करुन दिल्यानंतर कवी विशाल इंगोले यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा इंगोले, पुत्र समीर इंगोले, वडील दत्तात्रय इंगोले इतर कुटुंबीय यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह व ५ हजार रु. रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
मेहकर चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विशाल इंगोले हा धाडसाने परिवर्तनवादी विचार ठामपणे मांडणारा कवी होता, असे म्हणत आजअन्याय, अत्याचार, कर्मकांड यांच्या विरोधातील परिवर्तन चळवळ नेटाने पुढे नेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
पुरस्कारार्थी साहित्यिक प्रवीण तुराणकर यांनी सन्मानाला उत्तर देतांना विशालची कविता ही मुक्तछंदाचा वेगळाच प्रभाव पाहणारी असल्याचा अनुभव आल्याने आपण स्वतः त्यांच्या 'माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहाचा हिंदीतील मेरी हयात का प्रमाण अनुवाद केल्याचे सांगितले. सेवासंकल्प प्रकल्पाचे संस्थापक नंदकुमार पालवे यांनी विशाल है समाजातील वेदना जीवंत करणारे कवी होते असं म्हणत येथून पुढेही मुक्या वेदना उलगडणारे साहित्य निर्माण व्हावे, असे भावनिक आवाहनही याप्रसंगी केले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी सवंगडी असलेले विशाल यांचे मातीशी जवळचे नाते होते, असे सांगून जातीपातीच्या पलीकडलं व्यक्तिमत्व असल्याचा प्रत्यय उदाहरणातून स्पष्ट केला.
याप्रसंगी अन व औषधी प्रशासनातील अधिकारी गजानन घिरके, विठ्ठल चव्हाण यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते यांनी, सूत्रसंचलन साहित्यिक, व्याख्याते प्रा. रवीद्र साळवे यांनी तर समारोपीय आभारप्रदर्शन कवी किरण डोंगरदिवे यांनी केले कार्यक्रमाला साहित्य, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक आदि क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा