युवा नेते ब्रिजेश बोरुडे यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
आमदार काशीनाथ दाते यांच्या माध्यमातून अपधूप स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी १० लाख व चौक सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती युवा नेते ब्रिजेश बोरुडे यांनी दिली.
अपधूप (ता पारनेर) येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण व चौक सुशोभीकरणासाठी निधी मिळावा अशी मागणी, उद्योजक सुरेश शेठ गवळी व युवा नेते ब्रिजेश बोरुडे यांनी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आमदार काशीनाथ दाते यांनी तातडीने दखल घेत स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी तसेच चौक शिवशोभीकरणासाठी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच गेल्या चार वर्षात विकासात्मक कामे झाली आहेत.
यावेळी माजी सरपंच किसन साहेबराव गवळी,संतोष भगवंत गवळी, पुष्कराज गवळी,संकेत सोनवणे, आदीं उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा