कोणते आरक्षण पडते या विचाराने इच्छुकांची धडधड वाढली
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तलालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची २०२५ २०३० साठीची सार्वत्रिक निवडणूकीच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, सरपंच पदासाठी तालुक्यातील आरक्षण सोडत 23 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. ९९ ग्रामपंचायतीच्या एकूण ६१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असून, त्यातील ३१ ग्रामपंचायती महिला तर ३० ग्रामपंचायती पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी महिला १३ व पुरुष १३ अशा एकूण २६ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गसाठी १ पुरुष व १ महिला अशा दोन जागा राखीव आहेत. तसेच अनुसुचित जातीसाठी पुरुष १० व महिला १० अशा एकूण २० जागा राखीव आहेत. आरक्षण सोडतीसाठी सर्व ग्रामपंचायत येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा