मोटरसायकल स्वारचा उपचारादरम्यान मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील एक युवक सिंदखेडराजा येथील काम आटोपून घरी परत येत असताना दुसरबीडजवळील गणपती मंदिरासमोर मोटारसायकलचा अपघात झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव गणेश शिवाजी गरुडकर (वय २५) रा. शेंदुर्जन असे आहे.
शेंदुर्जन येथील गणेश गरुडकर हा सिंदखेडराजा येथे तहसीलच्या कामासाठी ६ एप्रिल रोजी गेला होता. सिंदखेडराजा येथून परत येत असताना त्याचे मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल दुसरबीड जवळील गणपती मंदिरासमोर असलेल्या नाल्यात जाऊन आदळली. यात गणेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. युवकांनी मोटारसायकल चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सर्वाधिक अपघात हे मोटारसायकलचे होत असल्याने आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा