अपघात होण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये संताप
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडरा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा, तालुक्यातील राहेरी येथील खडकपूर्णा कपर्णा नदीवरील धोकादायक अवस्थेतील पुलावरून अजूनही अवजड वाहतूक सेवा सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशालाही सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, संभाव्य अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
हा पूल गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहनांची वाहतूक सेवा थांबवण्याचे आदेश दिले होते. काही दिवस बेरिकेट लावून वाहतूक थांबवण्यात आली असली, तरी दोन-तीन दिवसांनंतर ती पुन्हा पूर्ववत सुरू होते. ही स्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या पुलावर लोखंडी प्लेट्स उघड्या पडलेल्या आहे. बाजूचे कठडे तुटलेले त्यांना भेगा पडलेले आहेत. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास असूनही दुर्लक्ष केले जात आहे.
पुलावरील जड वाहनांची नियमित वाहतूक चालू असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीयनि लक्ष देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा आणि तत्काळ जड वाहतूक सेवा पुलावरून बंद करावी, सदर पुलावर दोन्ही साईडला बंरिगेड लावून वाहतूक पर्यायी गाणे वळवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहेसंबंधित बांधकाम व पोलिस विभागाने काही दिवसांसाठी बॅरिकेट लावून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली.
मात्र, काहीच दिवसात ही उपछ्ययोजना हटवण्यात आली आणि अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाली त्यामुळे जिल्हाधिका-यांचे आदेश फक्त कागदापुरतेच असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे संबंधित बांधकाम व पोलिस विभागाने काही दिवसांसाठी बॅरिकेट लावून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. मात्र, काहीच दिवसात ही उपछ्ययोजना हटवण्यात आली आणि अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाली त्यामुळे जिल्हाधिका-यांचे आदेश फक्त कागदापुरतेच असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
नागरिकांमध्ये संताप
जिल्हाधिकान्यांचे आदेश इतक्या सहजपणे का पायदळी तुडवले जात आहेत? प्रशासन अपघात होण्याची वाट बघते आहे का? असे प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पुलावरची वाहतूक बंद न केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा