गाडगे कुटुंबियांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर तालुक्यातील पिंपरीजलसेन येथील जि.प.प्राथमिक शाळेमधे इयत्ता ६ वी मधे शिकणार्या स्वामी दत्ता गाडगे या विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेला वृक्षारोपणासाठी वृक्षभेट देत व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करुन साजरा करण्यात आला.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांचा स्वामी हा मुलगा असुन,शाळेमधे वक्षारोपण करुन साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार शाळेला अनेक वृक्षांची रोपे भेट देण्यात आली.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रावजी केसकर आणि केंद्रप्रमुख दौलत येवले,मुख्याध्यापक पांडूरंग पवार यांनी गाडगे कुटुंबियांचे मनपूर्वक कौतुक करत उपक्रमाचे स्वागत केले.
गाडगे परीवाराने आपल्या मुलाचा वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी पारंपरिक पार्ट्या आणि फुगे न लावता, मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण आणि गरजू मुलांना खाऊवाटपाचा उपक्रम राबवला. या वृक्ष रोपांमधे विविध प्रकारची फळझाडे व आॅक्सीजन देणार्या,सावली देणार्या झाडांची रोपे,फुलझाडे पुरविण्यात आली.तसेच, मुलांना खाऊवाटप करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात पर्यावरण जागृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संदेश जाईल असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी रावजी केसकर यांनी केले.पत्रकार दत्ता गाडगे व कुटुंबियांचे हे कार्य अनेकांचे लक्ष वेधून घेत असून, अनेकांनी अशा उपक्रमांचे कौतुक केले आहे.वाढदिवस साजरा करण्याची हि पद्धत समाजासाठी प्रेरणादायक ठरत असल्याचेही केसकर म्हणाले.
याप्रसंगी शिक्षक मल्हारी रेपाळे, जयप्रकाश साठे,सतीश भालेकर, प्रशांत दिघे, श्रीम.शारदा तांबे, श्रीम. सिंधू वाघ, श्रीम. मंगला हराळ, श्रीम. वर्षा पठारे, श्रीम. प्रियंका हजारे आदी उपस्थित होते. पिंपरीजलसेन येथील जि.प.प्राथमिक शाळेला वाढदिवसानिमीत्त वृक्षरोपे भेट देताना स्वामी गाडगे.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रावजी केसकर,केंद्रप्रमुख दौलत येवले,मुख्याध्यापक पांडूरंग पवार व शिक्षकवृंद.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा